Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गणरायाच्या आरतीतून शेतकऱ्यांच्या व्यथांना उजाळा; पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते महाआरती!

कर्जबाजारी बळीराजाच्या वेदनेला लोकमंगलचा हात; डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन!

0 8 5 6 2 6

गणरायाच्या आरतीतून शेतकऱ्यांच्या व्यथांना उजाळा; पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते महाआरती!

कर्जबाजारी बळीराजाच्या वेदनेला लोकमंगलचा हात; डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन!

तुळजापूर | प्रतिनिधी

एकीकडे निसर्गाची अवकृपा, पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान आणि दुसरीकडे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता डोंगर… अशा दुहेरी संकटात धाराशिव जिल्ह्यातील बळीराजा सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या वेदनेची जाणीव ठेवत गणेशोत्सव साधेपणाने, पारंपरिक पद्धतीने आणि समाजभान जपत साजरा करण्याचे आवाहन लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख व संचालक सचिन आडगळे यांनी केले.

लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लिमिटेड, सोलापूरच्या तुळजापूर शाखेतील कार्यालयात गणरायाची उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी गणपती बाप्पांची महाआरती तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा साप्ताहिक तुळजापूर नामा संपादक पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी शाखाधिकारी राजकुमार पवार, पदाधिकारी विनोद देवकर, खंडेराव देवकर, फजल सिद्धकी, धीरज पाटील, सुनील साळुंके यांच्यासह लोकमंगल मल्टीस्टेटचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मनोभावे गणरायाचे दर्शन घेत आरतीत सहभाग नोंदविला.

◾पर्यावरणपूरक गणरायाची प्रतिष्ठापना

माजी मंत्री सुभाष देशमुख आणि लोकमंगल समूहाचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या पुढाकारातून तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट कार्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

◾‘बळीराजाच्या जखमेवर डॉल्बीचा आवाज नको!’

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख व संचालक सचिन आडगळे यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणरायाचा उत्सव साजरा करावा, अनावश्यक ध्वनीप्रदूषण टाळावे आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या परिस्थितीचे भान ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

निसर्गाने खरीप हंगामावर घाला घातला असताना बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत आहे. अशा वेळी गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर समाजाच्या दुःखाशी एकरूप होण्याचा उत्सव ठरावा, हीच या उपक्रमातून भावना व्यक्त झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे