Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

आमदार तानाजी सावंतांनी तुळजाभवानी भक्तांची माफी मागावी; अन्यथा आंदोलन – भाजपचा इशारा

0 7 6 5 0 5

आमदार तानाजी सावंतांनी तुळजाभवानी भक्तांची माफी मागावी; अन्यथा आंदोलन – भाजपचा इशारा

तुळजापूर | प्रतिनिधी

आमदार तानाजी सावंत यांनी श्री तुळजाभवानी मातेच्या पवित्र प्रसादासंदर्भात केलेले वक्तव्य हे अत्यंत बेजबाबदार, आक्षेपार्ह आणि कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवर थेट आघात करणारे असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. आई तुळजाभवानीच्या प्रसादाला ‘ड्रग’ अशी उपमा देणे हा केवळ शब्दांचा घोटाळा नसून, भाविकांच्या भावना दुखावणारा गंभीर प्रकार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.आई तुळजाभवानीचा प्रसाद हा कोट्यवधी भक्तांसाठी मातेचा आशीर्वाद असून, त्याचा अपमान करण्याची हिंमत कोणालाही नसल्याचे भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी ठाम शब्दांत सांगितले. राजकीय वैफल्यातून देव, धर्म आणि श्रद्धेला लक्ष्य करणे हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण असून, आमदार तानाजी सावंत यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.तसेच लोकनेते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरच्या जनतेने नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना बहुमताने निवडून दिले असताना, त्यांच्यावर ड्रग्स प्रकरणाशी संबंधित आरोप करून संपूर्ण तुळजापूरच्या जनतेच्या जनादेशाचा अवमान करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.आई तुळजाभवानी मातेचा अपमान हा केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण भवानी भक्तांच्या भावना दुखावणारा प्रकार आहे. आमदार तानाजी सावंत यांनी तात्काळ आई तुळजाभवानीच्या भक्तांची आणि तुळजापूरच्या जनतेची जाहीर माफी मागावी.

अन्यथा श्रद्धेवर घाला घालणाऱ्यांना रस्त्यावर उतरून, कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने उत्तर दिले जाईल,असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे तुळजापूरसह भवानी भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवली जाईल, असे संकेत भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

आनंद कंदले
तालुकाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी, तुळजापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे