Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैध गुटखा विक्रीसाठी तरुणावर गुन्हा दाखल

अवैध गुटखा विक्रीसाठी तरुणावर गुन्हा दाखल

0 7 6 4 9 8

अवैध गुटखा विक्रीसाठी तरुणावर गुन्हा दाखल

येरमाळा : प्रतिनिधी

महाराष्ट्रात शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री करण्यासाठी तो साठवून ठेवणाऱ्या तरुणावर येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहीन नजीर पटवेकर (वय २९, रा. बादर्श नगर, वाशी ता. वाशी, जि. धाराशिव) हा दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारास १०.२० वा. तेरखेड ते कडकनाथवाडी या रस्त्यावर कल्याण घुले यांच्या शेताजवळ, तेरखेडा शिवारात संशयास्पदरीत्या थांबलेला असताना पोलिसांना दिसला.

तपास केला असता त्याच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, डायरेक्टर पान मसाला, सुगंधीत तंबाखूचे पुडे, व्ही-१ कंपनीचे तंबाखू पुडे व बादशाहा गुटख्याचे पुडे असे एकूण रु
९३,६६० किंमतीचे साहित्य विक्रीसाठी जवळ ठेवलेले आढळले.येरमाळा पोलिसांनी नमूद सर्व साहित्य जप्त करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम-१२३,२२३,२७४,२७५, अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

4.5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे