ब्रेकिंगमहाराष्ट्र
सिंदफळ गटात ‘निकाल आधीच ठरल्याची’ चर्चा; महाविकास आघाडीचा दबदबा कायम

0
7
6
5
0
5
तुळजापूर : सिंदफळ पंचायत समिती गण व जिल्हा परिषद सिंदफळ गटातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच राजकीय वर्तुळात निकालाबाबत ठाम चर्चा सुरू झाली आहे. गावागावातून मिळणारे संकेत पाहता जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. विश्रांती संजय शितोळे यांनी निवडणुकीवर मजबूत पकड मिळवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
प्रचार फेऱ्यांदरम्यान सौ. विश्रांती शितोळे यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून, प्रत्येक गावात मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. महिला मतदार, युवक वर्ग तसेच शेतकरी बांधवांचा कौल ठामपणे शितोळे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. त्यांच्या प्रचारसभांना होत असलेली गर्दी आणि कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे.
विकासाचा स्पष्ट अजेंडा, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि गावकेंद्रित प्रश्नांवर ठाम भूमिका यामुळे सौ. शितोळे यांच्याविषयी विश्वास वाढत आहे. “उमेदवार ग्रामीणचा -विकास गावांचा” हा संदेश मतदारांमध्ये खोलवर पोहोचल्याचे चित्र आहे.याउलट विरोधी गटाचा प्रचार काही गावांपुरता मर्यादित राहिल्याची चर्चा असून त्यांच्या बैठकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात वातावरण पूर्णतः बदलले असून विजयाची वाट सौ. विश्रांती शितोळे यांच्यासाठी सुकर होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.संपूर्ण सिंदफळ गटात सध्या महाविकास आघाडीचा दबदबा कायम असल्याचे चित्र असून मतदानापूर्वीच विरोधी गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याची चर्चा उघडपणे होत आहे.मतदानाच्या दिवशी हा कल मतपेटीत उतरल्यास सौ. विश्रांती संजय शितोळे यांचा दणदणीत विजय निश्चित मानला जात आहे.

0
7
6
5
0
5



