Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रीराम बीसीए बीसीएस महाविद्यालय, पानीव खो-खो स्पर्धेत अजिंक्य! संस्थेच्या मार्गदर्शक श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे चमकदार यश

0 7 6 5 0 5

श्रीराम बीसीए बीसीएस महाविद्यालय, पानीव खो-खो स्पर्धेत अजिंक्य! संस्थेच्या मार्गदर्शक श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे चमकदार यश

अकलुज : संजय निंबाळकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवातील खो-खो स्पर्धेत श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

स्पर्धेत श्रीराम महाविद्यालयाच्या संघाने विलक्षण समन्वय, चपळाई आणि तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. खेळातील संघभावना आणि जिद्दीच्या बळावर संघाने आपले अजिंक्यपद राखले. या उल्लेखनीय विजयामुळे महाविद्यालयाचे नाव संपूर्ण विद्यापीठात उजळले आहे.

संघाला क्रीडाशिक्षक प्रा. घुले आणि प्रा. वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, उपाध्यक्ष करण पाटील, सचिव ॲड.अभिषेक पाटील, सहसचिव डॉ. समीर पवार, विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वनवे, तसेच प्राचार्य राजेंद्र डावकरे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.

या कामगिरीने श्रीराम महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वर्चस्वाला आणखी बळकटी मिळाली असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे