ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
भ्रष्टाचार व व्यसनविरोधी कौल; महाविकास आघाडीची दमदार पत्रकार परिषद;दोन हजारांपेक्षा अधिक मतांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचा विजय निश्चित! – ॲड धीरज पाटील यांचा दावा
दोन हजारांपेक्षा अधिक मतांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचा विजय निश्चित! - ॲड धीरज पाटील यांचा दावा

0
7
6
4
9
8
भ्रष्टाचार व व्यसनविरोधी कौल; महाविकास आघाडीची दमदार पत्रकार परिषद

दोन हजारांपेक्षा अधिक मतांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचा विजय निश्चित! – ॲड धीरज पाटील यांचा दावा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूरमध्ये वाढत्या व्यसनप्रवृत्ती, मंदिर विकास व शहर आराखड्यातील पश्चिमेकडील बदलांचा प्रयत्न आणि पालिकेतील भ्रष्टाचार या सर्व मुद्द्यांवर महाविकास आघाडीने दि.३ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांनी या परिषदेत बोलताना तुळजापूरमधील व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून माता-भगिनींनी याविरोधात ठाम भूमिका घेतल्याचे सांगितले.

“व्यसनाधीनतेविरोधात आणि पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात तुळजापूरकरांनी मतदान करून जनशक्तीचे सामर्थ्य दाखवले आहे. हे निवडणूक धनशक्तीविरोधातील जनशक्तीचे यशस्वी उदाहरण ठरेल,असे मगर म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, इतर पक्षांच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला साथ देऊन मुठ बांधल्याबद्दल ते सर्वांचे आभार मानत. आम्ही सोशल इंजिनीअरिंग पद्धतीने उमेदवार उभे केले असून सर्वच समाजघटकांचा सहभाग घेतला आहे,असेही ते म्हणाले.
महिलांच्या वाढत्या सहभागाकडे लक्षवेधी इशारा
या वेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील म्हणाले,या निवडणुकीत महिलांची मतदान टक्केवारी पुरुषांपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिवर्तनाची लाट तुळजापूरमध्ये स्पष्ट दिसत आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दोन हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवतील आणि सर्व उमेदवार निवडून येतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे.
पैशाच्या जोरावर निवडणूक? – उमेदवारांचा निर्धार दणकट
महाविकास आघाडीचे अमोल कुतवळ म्हणाले,आमच्या काही उमेदवारांना विरोधकांकडून पैशाचे आमिष दाखवण्यात आले. मात्र एकाही उमेदवाराने डगमगता त्याला बळी पडले नाही. हेच आमच्या लढ्याचे बळ आहे.
व्यासपीठावर प्रमुख नेत्यांची उपस्थिती या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अमर मगर, नागनाथ भांजी, अमोल कुतवळ, आनंद जगताप, सुदर्शन वाघमारे, श्याम पवार, उत्तम अमृतराव, सुधीर कदम, भारत कदम, भोजने, बालाजी तट, तोफिक शेख, नरेश पेंदे तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
तुळजापूरच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध
तुळजापूरच्या विकासासाठी पारदर्शक कारभार, व्यसनमुक्ती, मंदिर विकास आराखड्यातील सुधारणा आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला.
0
7
6
4
9
8



