Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर शहरातील 5000 कुटुंबांची दिवाळी गोड;विनोद गंगणे यांच्या हस्ते दिवाळी किराणा किटचे वाटप

0 7 6 4 9 6

तुळजापूर शहरातील 5000 कुटुंबांची दिवाळी गोड;विनोद गंगणे यांच्या हस्ते दिवाळी किराणा किटचे वाटप

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त तुळजापूर शहरातील 5000 गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम युवा नेते विनोद गंगणे आणि गंगणे कुटुंबीयांच्या वतीने राबविण्यात आला. शहरातील हडको मैदानावर आयोजित या भव्य कार्यक्रमात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला श्री तुळजाभवानी मंदिर महंत तुकोजी बुवा,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,नितीन काळे, सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तुळजापूर शहरातील नागरिकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

दरवर्षी दीपावलीनिमित्त विनोद गंगणे यांच्या वतीने नागरिकांना भेट स्वरूपात दिवाळी किटचे वाटप केले जाते. यंदा या उपक्रमाचे सोळावे वर्ष असून गोरगरीब व कष्टकरी वर्गाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या हेतूने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी 5000 किराणा किट्ससोबत 1000 लहान मुलांना नवीन कपडे आणि फटाके भेटस्वरूप देण्यात आले.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगराध्यक्ष अर्चनाताई गंगणे, मा. सभापती विजय गंगणे, प्रियंका गंगणे, संगीता कदम, सज्जन सांळुके, आनंद कंदले, विशाल रोचकरी, निता क्षिरसागर, पूजा गंगणे, भारतीताई गवळी, दिनेश क्षिरसागर,धैर्यशील दरेकर,अमर हंगरगेकर,रोहित चव्हाण,समर्थ पैलवान यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विनोद गंगणे मित्र मंडळ आणि विजय सर गंगणे मित्र मंडळ यांनी केले. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला.

◾ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

कार्यक्रमादरम्यान विजय सर गंगणे मित्र मंडळाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. वर्षभर पाऊस, थंडी, वारा याची पर्वा न करता आपली सेवा बजावणाऱ्या या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.अकबर शेख, गणेश भातुसे, दिलीप जळके, सुरज बागल, संतोष गायकवाड, गणेश गायकवाड, पिंटू सराफ, दादा नन्नवरे आदींचा समावेश होता.

◾महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

या कार्यक्रमासाठी तुळजापूर शहरातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरात दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या उपक्रमामुळे तुळजापूर नगरीत समाधानाचे वातावरण पसरले आहे. राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले असून,आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी विनोद गंगणे हे भाजपाचे प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून नाव घेतले जात आहे.

3/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे