Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर तहसीलदारांच्या चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

शिवसेना मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या तक्रारीची दखल; गट क्रमांक १२४ मधील गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला वेग

0 8 5 6 2 6

तुळजापूर तहसीलदारांच्या चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

शिवसेना मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या तक्रारीची दखल; गट क्रमांक १२४ मधील गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला वेग

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील गट क्रमांक १२४ मधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव (सामान्य प्रशासन विभाग) येथून दि. २८ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, शिवसेना तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीवर ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

तक्रारीत मौजे निलेगाव,ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील गट क्रमांक १२४ मधील कथित गैरव्यवहारास जबाबदार धरत तत्कालीन तहसीलदार अरविंद बोंळगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

महसूल मंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना “चौकशी करून नियमानुसार योग्य कार्यवाही करावी” अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणाची सर्व बाजूंनी तपासणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, तक्रारीसंदर्भातील सर्व कागदपत्रे, लागू असलेले शासन निर्णय, परिपत्रके तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास त्याचाही विचार करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्याची प्रत अर्जदारालाही देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशामुळे तुळजापूरमधील गट क्रमांक १२४ जमीन प्रकरणाला नव्याने गती मिळाली असून,चौकशीनंतर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे