Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिवमध्ये पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा १५ मार्चला; ११९४ उमेदवार पात्र

धाराशिवमध्ये पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा १५ मार्चला; ११९४ उमेदवार पात्र

0 7 6 5 0 5

धाराशिवमध्ये पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा १५ मार्चला; ११९४ उमेदवार पात्र

धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२४-२५ मध्ये रिक्त असलेल्या १२३ पोलीस शिपाई पदांसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीतून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ११९४ उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तांबरी विभाग, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी सकाळी ठीक ०७.०० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तसेच उमेदवारांनी परीक्षेला येताना महाआयटीकडून मैदानी चाचणी व लेखी परीक्षेसाठी देण्यात आलेले हॉलतिकीट, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, मैदानी चाचणीवेळी कार्यालयाकडून देण्यात आलेले ओळखपत्र तसेच आधारकार्ड, वाहन परवाना किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक ओळख पुरावा सोबत आणणे बंधनकारक असल्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे