Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीला ‘बसवरत्न पुरस्कार-२०२६’; २८ जून रोजी मुरूम येथे होणार सन्मान

२५ वर्षांच्या रेल्वे संघर्षाला राज्यस्तरीय गौरव

0 8 5 6 3 1

२५ वर्षांच्या रेल्वे संघर्षाला राज्यस्तरीय गौरव

तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीला ‘बसवरत्न पुरस्कार-२०२६’; २८ जून रोजी मुरूम येथे होणार सन्मान

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळा

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी गेल्या सुमारे २५ वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणाऱ्या तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. बसव प्रतिष्ठानचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी समितीला ‘राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार-२०२६’ जाहीर केला आहे. हा पुरस्कार रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुरूम येथील अयोध्या कॉम्प्लेक्स, रत्नमाला मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रदान करण्यात येणार आहे.

सन २००६ पासून तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीने सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी सातत्याने आंदोलन, निवेदने, पाठपुरावा आणि जनजागृती केली. या संघर्षाची दखल घेत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने या रेल्वे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर ‘तुळजाभवानी एक्सप्रेस’ धावणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या पुरस्कारासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष संघर्षयोद्धा बबनराव गावडे यांच्यासह विकासराव तांबे, राऊफ शेख, अशोकराव साळुंखे, पत्रकार अंबादासराव पोपळे, रत्नाकर खोले, कोंडीबा प्रताप, सतीश पवार, अनिल हंगरगेकर, मोहन भोसले, तानाजी (आप्पा) पाटील, खय्युम शेख, गोविंद दिवटे, राहुल मलकू, नाईक गवळी, दयानंद पांचाळ, अनमोल साळुंखे आणि शुभम खोले यांचा गौरव करण्यात येणार आहे.

समारंभ बसव प्रतिष्ठानचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम नगर परिषदेचे अध्यक्ष बापूराव (काका) पाटील राहणार आहेत. तसेच युवा नेते बळीराजा पानंद रस्ते समितीचे अध्यक्ष शरणाजी बसवराज पाटील, नळदुर्ग नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज धरणे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते संघर्ष योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे