Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरात तरुणावर जीवघेणा हल्ला; चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

तुळजापूरात तरुणावर जीवघेणा हल्ला; चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

0 7 6 4 9 7

तुळजापूरात तरुणावर जीवघेणा हल्ला; चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

तुळजापूर : शहरातील जि.प. कन्या प्रशालेच्या आवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनोज कोरडे, अमोल कोरडे (दोघे रा. हाडको, तुळजापूर), जोतीराम जाधव (रा. तुळजापूर खुर्द) व मनोज कांबळे (रा. हाडको, तुळजापूर) यांनी दि. 06 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास जि.प. कन्या प्राथमिक शाळेच्या आवारातील बाजा कट्ट्याजवळ फिर्यादी पार्थ शशिकांत कराडे (वय 24, रा. आर्य चौक, तुळजापूर) यांना अडवून मारहाण केली.मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच स्टील करवत व एका बाजूस धार असलेल्या लाकडी मुठीच्या हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पार्थ कराडे यांनी दि. 08 मे 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

3.5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे