Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तहानलेल्या वन्यजीवांसाठी मनसेची धाव; पानवठ्यांत पाण्याची सोय

वनविभाग झोपेत, मनसेची धाव; पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजीवांना दिलासा

0 7 6 4 9 7

तहानलेल्या वन्यजीवांसाठी मनसेची धाव; पानवठ्यांत पाण्याची सोय

धाराशिव : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तहानलेल्या वन्यप्राण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुढे सरसावली असून पानवठ्यांत पाणी उपलब्ध करून देत अनोखा उपक्रम राबवला आहे.एक मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक गाठला असताना माणसांसोबतच वन्यजीवांचीही पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. हरीण, ससे, मोर यांसारखे वन्य अनेकप्राणी पाण्यासाठी वनात भटकताना दिसत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तयार केलेल्या पानवठ्यांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाणी सोडून प्राण्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला.जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिक्षक सेनेचे नेते बबनराव वाघमारे, विद्यार्थी सेनेचे तन्मय वाघमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते अकबर काझी उपस्थित होते.“मुक्या प्राण्यांची तहान भागवणे हीच खरी मानवता” या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.दरम्यान, या उपक्रमामुळे उन्हाच्या कडाक्यात वन्यजीवांना दिलासा मिळाला असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मनसेचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

वनविभाग झोपेत, मनसेची धाव; पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजीवांना दिलासा

कडक उन्हात वन्यप्राणी पाण्यासाठी वनात भटकत असताना वनविभाग मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पानवठ्यांत पाणी सोडून वनविभागालाच लाजवणारे काम केले. हरीण, ससे, मोर यांसारख्या प्राण्यांना पाण्याअभावी जीव धोक्यात येत असताना अधिकाऱ्यांची उदासीनता संतापजनक ठरत आहे. दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने जबाबदारी स्वीकारून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे