Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर : काँग्रेस पक्षाच्या रणनितीला आकार — शहराध्यक्ष भारत कदम यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक

तुळजापूर : काँग्रेस पक्षाच्या रणनितीला आकार — शहराध्यक्ष भारत कदम यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक

0 7 6 5 0 5

तुळजापूर : काँग्रेस पक्षाच्या रणनितीला आकार — शहराध्यक्ष भारत कदम यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

आगामी तुळजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष भारत कदम यांच्या पुढाकाराने पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक बुधवार, दि.२९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वा. शारदा मंगल कार्यालय, तुळजापूर येथे होणार असून, या बैठकीला सर्व काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष कदम यांनी केले आहे.

नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा शहराच्या विकासाचे सूत्र आपल्या हाती घेईल, असा निर्धार या बैठकीत व्यक्त होणार आहे. मागील कार्यकाळातील अपूर्ण राहिलेली विकासकामे, नव्या प्रभाग रचनेतील बदल, मतदार संपर्क मोहीम तसेच युवा कार्यकर्त्यांचा सहभाग या सर्व विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष भारत कदम यांनी दिली.

काँग्रेस पक्ष हा जनतेच्या विकासासाठी कार्य करणारा पक्ष असून, तुळजापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शहराध्यक्ष कदम यांनी केले आहे. निवडणुकीपूर्वी पक्षातील एकता आणि समन्वय दृढ करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात या बैठकीकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे