Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकेच्या दागिन्यांची चोरी; १.२६ लाखांचा ऐवज लंपास

0 7 6 5 2 2

तुळजापूर : आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकेच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना तुळजापूर येथे उघडकीस आली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा मानसिंग सुळ (वय ३४, रा. जळोची, ता. बारामती, जि. पुणे) या दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.४८ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना त्यांनी पुजारी सुधाकर आनंदराव चोपदार यांच्या काउंटरवर आपले दागिने ठेवले होते. त्यावेळी अज्ञाताने संधी साधून हे दागिने चोरून नेल्याचे नंतर निदर्शनास आले.चोरीला गेलेल्या ऐवजात १७ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण तसेच ४ ग्रॅम वजनाचे झुमके असा एकूण सुमारे १ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. दर्शन आटोपून दागिने घेण्यासाठी काउंटरवर गेल्यानंतर ते आढळून न आल्याने मनिषा सुळ यांनी शोधाशोध केली. मात्र दागिने न मिळाल्याने त्यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून आरोपी विष्णु भरत बनसोडे (रा. चिंचोली) याच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच साक्षीदारांची चौकशी केली जात आहे.तुळजापूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशा ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे