ब्रेकिंगमहाराष्ट्र
कुलेश देशमुख कुटुंबाकडून तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५१ हजारांची देणगी

0
7
6
4
9
9
कुलेश देशमुख कुटुंबाकडून तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५१ हजारांची देणगी
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
पुणे येथील सुस परिसरातील भाविक कुलेश गणेशराव देशमुख हे आज सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूर येथे दाखल झाले. सकाळी त्यांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे श्रद्धेने दर्शन घेतले.दर्शनानंतर देशमुख कुटुंबीयांनी देवीचरणी आपली भक्ती अर्पण करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला देणगी स्वरूपात ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या धार्मिक व सेवाभावी कार्याबद्दल मंदिर संस्थानच्या वतीने कुलेश देशमुख व त्यांच्या पत्नीचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देण्यात आले.
मंदिर संस्थानच्या वतीने देशमुख दांपत्याचे आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, नागेश शितोळे तसेच संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0
7
6
4
9
9



