Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरचे सुपुत्र ॲड.नितीन सुरेश साळुंके यांची केंद्र सरकारच्या स्टॅंडिंग कौन्सिल पदावर प्रतिष्ठित नियुक्ती!

शहरात विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव !

0 7 6 4 9 6

तुळजापूरचे सुपुत्र ॲड.नितीन सुरेश साळुंके यांची केंद्र सरकारच्या स्टॅंडिंग कौन्सिल पदावर प्रतिष्ठित नियुक्ती!

शहरात विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

कायद्याच्या क्षेत्रात तुळजापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारा मानाचा तुरा शहराच्या मुकुटात अधिकच भर घालणारा ठरला आहे. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस, नवी दिल्ली यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार तुळजापूरचे सुपुत्र ॲड. नितीन सुरेश साळुंके यांची स्टॅंडिंग कौन्सिल फॉर युनियन ऑफ इंडिया (सरकारी वकील – भारत सरकार) म्हणून प्रतिष्ठित नियुक्ती करण्यात आली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रभाग क्रमांक चार मधील इच्छुक उमेदवार सुदर्शन वाघमारे, यशवंतराव वाघमारे, जयवंतकुमार वाघमारे, सुचित्रा वाघमारे तसेच वाघमारे परिवार उपस्थित राहून ॲड. साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास तुळजापूरचे युवा उद्योजक प्रतीक श्रीकांत वाघे, श्रीकांत वाघे, एन. डी. शिंदे, बबन वीर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी ॲड. नितीन साळुंके यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.या नियुक्तीमुळे तुळजापूरकरांचा अभिमान वाढवणारा आणि स्थानिक तरुण वकिलांसाठी प्रेरणादायी ठरलेला हा क्षण ठरला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे