ब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्हा परिषद गटात मतविभागणीचा फटका; ॲड. रामचंद्र ढवळेंचा पराभव, भाजपाचे दयानंद शिंदे विजयी
जिल्हा परिषद गटात मतविभागणीचा फटका; ॲड. रामचंद्र ढवळेंचा पराभव, भाजपाचे दयानंद शिंदे विजयी

0
7
6
4
9
7
तुळजापूर : जिल्हा परिषद गटातून झालेल्या अलीकडील निवडणुकीत मतविभागणीचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे उमेदवार ॲड. रामचंद्र ढवळे यांना पराभव पत्करावा लागला असून, आघाडीतील बिघाडीचा थेट फायदा भाजपाचे उमेदवार दयानंद शिंदे यांना झाला. शिंदे यांनी ६,३७५ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला.
या जिल्हा परिषद गटातील लढतीत ॲड. रामचंद्र ढवळे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवून ३,६९१ मते मिळवली. मात्र, महाविकास आघाडीतीलच काँग्रेसकडून अमोल किसन झोंबाडे यांनी उमेदवारी केल्याने मतांचे विभाजन झाले. झोंबाडे यांना २,९४२ मते मिळाली. ही दोन्ही मते एकत्र आली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असू शकले असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.याशिवाय, वंचित बहुजन आघाडीकडून मिलिंद रोकडे यांनी निवडणूक लढवून १,०२५ मते मिळवली. अपक्ष उमेदवार बाळासाहेब ढवळे यांना केवळ ६१ मते मिळाली, तर नोटा (NOTA) पर्यायाला ९० मतदारांनी पसंती दिली. एकूणच या सर्व मतविभागणीचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
राजकीय विश्लेषकांच्या मते,आघाडीतील समन्वयाचा अभाव आणि एकाच विचारधारेतील उमेदवारांचे स्वतंत्रपणे मैदानात उतरणे हीच पराभवाची प्रमुख कारणे ठरली. दुसरीकडे, भाजपाचे दयानंद शिंदे यांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत आघाडीतील मतांचे विभाजन साधले आणि निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला.या जिल्हा परिषद गटातील निकालामुळे महाविकास आघाडीतील एकजुटीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल मोठी शिकवण देणारा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
0
7
6
4
9
7



