Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर न्यायालयासाठी बसथांब्याची मागणी; मधुकरराव चव्हाण यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

0 7 6 4 9 6

तुळजापूर न्यायालयासाठी बसथांब्याची मागणी; मधुकरराव चव्हाण यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

तुळजापूर : तुळजापूर येथे नळदुर्ग रोडवर नव्याने सुरू होणाऱ्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासाठी सर्व बसेसना थांबा देण्यात यावा, तसेच न्यायालयीन वेळेनुसार विशेष बस सेवा सुरू करावी, अशी मागणी माजी परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांना निवेदन दिले आहे. नळदुर्ग रोडवर शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर नवीन न्यायालयाची इमारत असून, तुळजापूरहून तेथे जाण्यासाठी रिक्षाभाडे १०० ते १५० रुपये आकारले जाते. हे भाडे न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या पक्षकारांना परवडणारे नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तुळजापूरहून नळदुर्गकडे जाणाऱ्या सर्व बसेसना न्यायालयाच्या इमारतीजवळ थांबा देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सकाळी १०.३० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता न्यायालयापर्यंत विशेष बस सोडण्याची व्यवस्था करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

या मागणीमुळे न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या पक्षकार, वकील व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे