Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेसाठी आता ऑनलाइन सोडत! नोव्हेंबरचे वेळापत्रक जाहीर; भाविकांनी नोंदणीसाठी सज्ज व्हा!

१९ ते २४ ऑक्टोबरदरम्यान नोंदणीची संधी; तीन टप्प्यांत ऑनलाइन सोडत, अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रक्रिया पूर्ण करण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन

0 8 5 6 3 1

तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेसाठी आता ऑनलाइन सोडत! नोव्हेंबरचे वेळापत्रक जाहीर; भाविकांनी नोंदणीसाठी सज्ज व्हा!

१९ ते २४ ऑक्टोबरदरम्यान नोंदणीची संधी; तीन टप्प्यांत ऑनलाइन सोडत, अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रक्रिया पूर्ण करण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने नोव्हेंबर २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. सिंहासन पूजेची नोंदणी १९ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत भाविकांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन सोडतीद्वारे पूजेची संधी निश्चित केली जाणार आहे.

सिंहासन पूजेची नोंदणी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर

https://online.shrituljabhavani.org

येथे करावी, असे आवाहन तहसीलदार तथा मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी केले आहे.

तीन टप्प्यांत ऑनलाइन सोडत

पहिली सोडत २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, निवड झालेल्या भाविकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. पेमेंटसाठी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुदत आहे. सिंहासनांची संख्या पूर्ण न झाल्यास २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे दुसरी व तिसरी सोडत काढण्यात येणार आहे. अंतिम यादी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

एका सिंहासनाची विशेष तरतूद

८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या पूजेसाठी एक सिंहासन राखीव ठेवण्यात येणार आहे. देशभरातून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी निर्धारित वेळेत ऑनलाइन नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे