ब्रेकिंगमहाराष्ट्र
चिंचपूर खुर्द खूनप्रकरणातील मुख्य आरोपी अखेर जेरबंद
बसवकल्याण येथून स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई; पोलिसांना पाहताच आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

0
7
6
4
9
6
चिंचपूर खुर्द खूनप्रकरणातील मुख्य आरोपी अखेर जेरबंद
बसवकल्याण येथून स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई; पोलिसांना पाहताच आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खूनप्रकरणातील मुख्य फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र शिताफीने पाठलाग करत पोलिसांनी त्याला जेरबंद केले.पोलीस ठाणे आंबी येथे गुन्हा क्रमांक ९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१) व ३ (५) अंतर्गत चिंचपूर खुर्द येथील खूनप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) हा घटनेनंतर फरार होता.फरार आरोपी बसवकल्याण (कर्नाटक) येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी विशेष पथक रवाना केले. बसवकल्याण येथे आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांची चाहूल लागताच दीपक गरड याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडस आणि शिताफी दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंबी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.पथकाची उल्लेखनीय कामगिरीही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव,नितीन जाधवर,बबन जाधवर तसेच चालक पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांचा समावेश होता.बहुचर्चित खूनप्रकरणातील मुख्य आरोपीच्या अटकेमुळे तपासाला गती मिळणार असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
7
6
4
9
6



