Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरात पार्किंगच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट; रमेश कदम यांचा आरोप

भाविकांना मूलभूत सुविधांचा अभाव; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0 7 6 5 0 5

तुळजापूरात पार्किंगच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट; रमेश कदम यांचा आरोप

भाविकांना मूलभूत सुविधांचा अभाव; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

तुळजापूर : तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत राज्यभरातून येणाऱ्या भाविक भक्तांची पार्किंगच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप सिवसेना शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख रमेश कदम (चिवचिवे) यांनी केला आहे. चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता,नगरपालिका प्रशासनाने भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईचे शहरात कुठेही उभारलेली दिसत नाही स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.तुळजापूर शहरात प्रवेश करताच विविध ठिकाणी पार्किंगच्या नावाखाली भाविकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अधिकृत दरफलक नसताना, कुठल्याही प्रकारचे नियमन नसल्याने भाविकांना आर्थिक फटका बसत आहे. अनेक ठिकाणी पावती न देता पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.रमेश कदम यांनी सांगितले की, “आई भवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याऐवजी त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. पार्किंग व्यवस्थेचा कोणताही सध्याठोस आराखडा नसल्याने नागरिक व भाविक त्रस्त झाले आहेत.प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ही लूट थांबवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, योग्य दिशादर्शक फलक यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवत आहे. मोठ्या धार्मिक स्थळाला साजेशी सुविधा नसल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी वाढत आहे. चैत्र पौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या उत्सवाच्या काळात या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत.रमेश कदम यांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी स्वतः लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणावी, तसेच पार्किंगसाठी निश्चित दर जाहीर करून अधिकृत व्यवस्था उभी करावी, अशी मागणी केली आहे.भाविकांची होणारी गैरसोय आणि आर्थिक लूट रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

3/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे