कळंब : राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ३०६ पट्टूंचा सहभाग; रोटरी क्लबच्या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात उत्साही वातावरणात स्पर्धा संपन्न
कळंब : राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ३०६ पट्टूंचा सहभाग; रोटरी क्लबच्या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात उत्साही वातावरणात स्पर्धा संपन्न
कळंब : शहरातील रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने प्रथमच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून तब्बल ३०६ बुद्धिबळपट्टूंनी सहभाग नोंदवत आपली बुद्धी व रणनीतीची चमक दाखवली.

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ येथील इनडोअर स्टेडियममध्ये ही एकदिवसीय स्पर्धा उत्साहात पार पडली. सकाळी झालेल्या उद्घाटन सोहळ्यास रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधवर अध्यक्षस्थानी होते. सचिव श्याम जाधवर, सपोनि पंढरीनाथ मगर, नायब तहसीलदार गोकुळ भराडिया, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, महादेव खराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवसभर स्वीस लिग पद्धतीने आठ साखळ्यांचे सामने रंगले. बुद्धिबळपटूंनी आपली रणनीती, तर्कशक्ती व संयमाचा कस दाखवत रंगतदार खेळ सादर केला. या यशस्वी आयोजनासाठी रोटरी परिवारातील संजय घुले, अरविंद शिंदे, सुशीलकुमार तीर्थकर, रवी नारकर, प्रा. डॉ. संजय सावंत, सीए दत्तात्रय टोणगे, सुब्राव कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष डॉ. जाधवर, सचिव श्याम जाधवर, महादेव खराटे, सतीश टोणगे यांची उपस्थिती होती.



