Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

निलेगाव परिसरात ऊसाला अज्ञात व्यक्तीने लावली आग बैलगाडी,पाईप साहित्यासह मोठे नुकसान; प्रशासनाकडून अद्याप पंचनामा नाही !

0 7 6 4 9 6

निलेगाव परिसरात ऊसाला अज्ञात व्यक्तीने लावली आग बैलगाडी,पाईप साहित्यासह मोठे नुकसान; प्रशासनाकडून अद्याप पंचनामा नाही !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील निलेगाव परिसरातील शेतकरी अहमद मैनोदीन शेख (रा. निलेगाव, गट क्र.१०६) यांच्या शेतातील ऊसाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन एकर क्षेत्रावर उसतोड सुरू असताना यातील एक एकर ऊस कारखान्याकडे रवाना झाला होता; मात्र उर्वरित दोन एकर ऊसास शुक्रवार, दि.२१ नोव्हेंबर रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावली.

या आगीत शेतातील एक लाखडी बैलगाडी, जवळपास पंचवीस पाईप सेटसह इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. आधीच कारखान्याची उसतोड उशीरा सुरू झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत असताना या आगीत भर पडली आहे.

दरम्यान, पंचनामा करण्यास अडथळा महसूल अधिकाऱ्यांनी “विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या चिरंजीवांच्या विवाहामुळे सर्व मंत्री तुळजापूरात आहेत” असे सांगत उडवा-उडवीची भूमिका घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे प्रभावित शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे.

 

या घटनेचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त अहमद शेख यांना योग्य व जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व गावकऱ्यांकडून होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे