प्रभाग ४ अंधारातून प्रकाशाकडे! जनसेवेचा नवा अध्याय; रुग्णवाहिका सेवा — जनतेसाठी, जनतेच्या सेवेत… नेहमी तत्पर! -नगरसेवक सुनील रोचकरी
प्रभाग ४ अंधारातून प्रकाशाकडे!
जनसेवेचा नवा अध्याय; रुग्णवाहिका सेवा — जनतेसाठी, जनतेच्या सेवेत… नेहमी तत्पर! -नगरसेवक सुनील रोचकरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
“जनसेवा हिच ईश्वर सेवा, माझा प्रभाग… माझी जिम्मेदारी!” या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत प्रभाग क्रमांक ४ मधील जनतेसाठी माजी नगरसेवक सुनील रोचकरी यांनी एक अनोखी आणि हृदयस्पर्शी सेवा सुरू केली आहे.

प्रभागातील नागरिकांना ‘ना नफा -ना तोटा’ या तत्वावर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा तातडीने मिळावी, या हेतूने सर्व सोयींनी सुसज्ज रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे.ही रुग्णवाहिका दिनांक ९ नोव्हेंबरपासून प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास १२ महिने उपलब्ध राहणार आहे.जनतेच्या प्रत्येक अडचणीला प्राधान्य देत, समस्या सोडविण्याचा कटाक्ष ठेवून काम करणारे माजी नगरसेवक सुनील रोचकरी पुन्हा एकदा जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.प्रभाग ४ मध्ये अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा नेतेचा उपक्रम-“जनसेवक सुनील रोचकरी यांचा हृदयस्पर्शी जनआधारित उपक्रम” म्हणून सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.




