ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुरतगावात पाच वर्षीय बालकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
सुरतगावात पाच वर्षीय बालकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

0
7
6
4
9
8
सुरतगावात पाच वर्षीय बालकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे एका हृदयद्रावक घटनेत पाच वर्षीय बालकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रणवीर लखन इटकर (वय ५, रा. सुरतगाव) असे मृत बालकाचे नाव असून, ही घटना दि.७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरात घडल्याचे समजते.प्राप्त माहितीनुसार, रणवीर हा घरात खेळत असताना अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आला. जोरदार शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे इटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने रुग्णालयात धाव घेतली. पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, नेमका शॉक कशामुळे लागला, याबाबत चौकशी केली जात आहे. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून, पुढील कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सुरतगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
0
7
6
4
9
8



