Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

काळेगावच्या जी.प. शाळेची दुरवस्था; सीएसआर फंडातून रोल मॉडेल शाळा उभारण्याची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांकडे आकाश भोवाळ यांचे निवेदन; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

0 7 6 5 1 9

काळेगावच्या जी.प. शाळेची दुरवस्था; सीएसआर फंडातून रोल मॉडेल शाळा उभारण्याची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांकडे आकाश भोवाळ यांचे निवेदन; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पवनचक्की प्रकल्पधारक कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शाळेसाठी भरीव मदत मंजूर करण्यात यावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे तालुका उपाध्यक्ष आकाश कालिदास भोवाळ यांनी जिल्हाधिकारी तथा पवनचक्की सनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भोवाळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी २४ एप्रिल २०२५ रोजी पवनचक्की कंपन्यांकडून सीएसआर निधी खर्च होत नसल्याबाबत तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता. त्यानंतर तुळजापूरचे आमदार तथा मित्रचे अध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील यांनी संबंधित कंपन्यांची बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तसेच मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती सीएसआर निधीतून करण्याच्या सूचना दिल्याचेही समाज माध्यमांद्वारे समजल्याचे त्यांनी नमूद केले.काळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत. इमारतीचा पाया खचला असून दरवाजे तुटलेले आहेत. अनेक वर्गखोल्यांना खिडक्याच नाहीत. शाळेचे संरक्षक तारकंपाऊंड गेल्या दहा वर्षांपासून अस्तित्वात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पावसाळ्यात शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने “शाळेत तळे की तळ्यात शाळा” अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या दुरवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा सोडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे मोर्चा वळविल्याचेही भोवाळ यांनी सांगितले.

सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व सीएसआर निधीतून काळेगाव येथे जिल्ह्यातील आदर्श व डिजिटल सुविधांनी सुसज्ज अशी रोल मॉडेल शाळा उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत आमदार राणाजगजीतसिंह पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांनाही देण्यात आली आहे.

जि.प. सदस्य नुतन सदस्य दयानंद शिंदे यांची ग्वाही

काक्रंबा जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे यांच्याकडे हा प्रश्न मांडला असता, त्यांनी दि. १२ मे रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय उपस्थित करण्याची ग्वाही दिली आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे