Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नेमकं नगरपालिका कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे?”; गट नं. 138/1 प्रकरणावर तुळजापुरात राजकीय रणकंदन

नेमकं नगरपालिका कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे?”; गट नं. 138/1 प्रकरणावर तुळजापुरात राजकीय रणकंदन

0 7 6 4 9 7

नेमकं नगरपालिका कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे?”; गट नं. 138/1 प्रकरणावर तुळजापुरात राजकीय रणकंदन

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरातील गट नं. १३८/१ मधील कथित बेकायदेशीर विकास आराखडा, संशयास्पद खरेदी-विक्री व्यवहार आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.“नेमकं नगरपालिका कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे?” असा थेट सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.या प्रकरणी माजी उपनगराध्यक्षांसह २६ जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेविका प्रगती लोंढे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. तक्रारदारांच्या निवेदनानुसार, गट नं.१३८/१ मधील सुमारे २ हेक्टर ६३ आर क्षेत्रात कथित बेकायदेशीर विकास आराखडा तयार करून मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले.
पालिकेवर भाजपची सत्ता असली तरी आता या प्रकरणात काँग्रेसचे पाच नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी थेट मोर्चा उघडला आहे. काँग्रेस गटनेते तथा नगरसेवक अमोल कुतवळ, नगरसेविका प्रगतीताई लोंढे-कदम, नगरसेवक आनंद जगताप, नगरसेवक अक्षय परमेश्वर आणि नगरसेवक रणजीत इंगळे यांनी यात्रा मैदान प्रकरणी उघडपणे भूमिका घेतली आहे.विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनाही या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने हे प्रकरण अधिकच राजकीय रंग घेऊ लागले आहे.“भाविकांसाठी यात्रा मैदान खुले करणारच,” असा निर्धार या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, शहरातील नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत तीव्र चर्चा सुरू असून, “अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार की पुन्हा फाईल दाबून ठेवली जाणार?” असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि कथित गैरव्यवहारांवर खरोखर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे