ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर युवासेनेची धुरा गणेश रोचकरी यांच्या खांद्यावर; संघटन बांधणीला नवी ताकद
तुळजापूर युवासेनेची धुरा गणेश रोचकरी यांच्या खांद्यावर; संघटन बांधणीला नवी ताकद

0
7
6
5
0
5
तुळजापूर युवासेनेची धुरा गणेश रोचकरी यांच्या खांद्यावर; संघटन बांधणीला नवी ताकद
तुळजापूर : शिवसेना युवासेनेच्या संघटन विस्ताराला गती देत गणेश देवानंद रोचकरी यांची तुळजापूर विधानसभा युवासेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात युवासेनेचे संघटन आणखी भक्कम होणार असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांतून व्यक्त होत आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि एकनाथ शिंदे यांच्यानेतृत्वाखाली युवासेना राज्यभर संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

मतदार नोंदणी, एस.आय.आर. प्रक्रिया आणि युवक संघटन वाढविण्यासाठी रोचकरी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे माजी खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, ॲड योगेश केदार व अमरराजे कदम यांनी स्वागत केले आहे.दरम्यान,युवकांच्या ताकदीवर तुळजापूरमध्ये युवासेनेचा झेंडा आणखी बुलंद होईल,असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून रोचकरी यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0
7
6
5
0
5



