ब्रेकिंगमहाराष्ट्र
मुंबईच्या लालबागच्या राजाप्रमाणे तुळजापुरात ‘श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती’चा थाट!
शहरातील पत्रकारांच्या हस्ते गणरायाची महाआरती; पत्रकारांना झाडांची भेट देत ‘वृक्षसंवर्धना’चा अनोखा संदेश

0
8
5
6
2
9
मुंबईच्या लालबागच्या राजाप्रमाणे तुळजापुरात ‘श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती’चा थाट!

शहरातील पत्रकारांच्या हस्ते गणरायाची महाआरती; पत्रकारांना झाडांची भेट देत ‘वृक्षसंवर्धना’चा अनोखा संदेश
तुळजापूर | तुळजापूरनामा
मुंबईचा लालबागचा राजा जसा भक्तांचे श्रद्धास्थान, त्याच धर्तीवर तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या पुण्यपावन नगरीतील शुक्रवार पेठेचा ‘श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती’ भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गणरायाची विशेष आरती आयोजित करण्यात आली. या आरतीचा मान तुळजापूर शहरातील पत्रकारांना देण्यात आला.

श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती सेवा समिती, तुळजापूर आणि राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात शहरातील पत्रकारांनी एकत्रितपणे गणरायाची आरती केली. यावेळी गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

या वेळी पत्रकार जगदीश कुलकर्णी, गोविंद खुरुद, गुरुनाथ बडूरे, संजय खुरुद, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, सतीश फतेपुरे, सचिन ताकमोघे आणि तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप अमृतराव यांच्या शुभहस्ते श्रींची आरती संपन्न झाली.

◾पत्रकारांच्या हस्ते आरती; मंडळाचा आगळा उपक्रम!
आरतीनंतर राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांना झाडांची भेट देण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव न करता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.

‘एक गणपती, एक झाड आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प’ या भावनेतून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनावर मंडळाने विशेष भर दिला आहे. गणरायाच्या उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देत तरुण मंडळाने पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
◾राजा कंपनीची तरुणाई पर्यावरणाच्या मैदानात!
यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष गणेश साळुंके, दादा रोकडे,अध्यक्ष गोविंद बंटी पेंदे, उपाध्यक्ष मंगेश साळुंखे, कोषाध्यक्ष शुभम गाजरे, सहकार्याध्यक्ष हरिभाऊ साळुंखे, सचिव मारुती कने, सहसचिव कृष्णा जाधव आणि समाजमाध्यम प्रमुख ओम साळुंखे यांच्यासह राजा कंपनी तरुण मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.
गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई, ढोल-ताशे आणि जल्लोष नव्हे, तर समाजहिताचा संदेश देण्याची संधी आहे, हे राजा कंपनी तरुण मंडळाने झाडांची भेट देत अधोरेखित केले. त्यामुळे शुक्रवार पेठेतील ‘श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती’च्या उत्सवाला भक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचीही हिरवी किनार लाभली आहे.
0
8
5
6
2
9



