Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामासाठी देणगी

श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामासाठी देणगी

0 7 6 5 0 5

श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामासाठी देणगी

अविनाश जोशी । करमाळा

करमाळा येथील श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील मूळ मंदिर भाविकांना पुन्हा दर्शनासाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिर जतन व संवर्धनाचे काम गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून, भाविकांच्या देणगी रूपी सहकार्यातून या उपक्रमाला गती मिळत आहे.

मंदिर जतन व संवर्धन कामासाठी गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी करमाळा येथील श्री. चेतन दिलीपराव ढाळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न करता रोख देणगी रुपये ५,०००/- (पाच हजार रुपये) मंदिर समितीकडे सुपूर्द केली. या निमित्ताने श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक अशोक गाठे यांनी त्यांचा सहपरिवार सत्कार केला. यावेळी ढाळे परिवार व भक्तगण उपस्थित होते.

श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असल्याने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन श्रीजगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : अशोक गाठे, व्यवस्थापक, मो. नं. ९४०४७०८९२४.

4/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे