Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

निरोगी स्त्री – समृद्ध समाज! अकलूजमध्ये भव्य महिला आरोग्य शिबिराला महिलांची मोठा प्रतिसाद !

"मी प्रथम निरोगी!" - डॉ. मीनाक्षी जगदाळे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने महिलांमध्ये जागरूकता वाढली

0 7 6 4 9 8

निरोगी स्त्री – समृद्ध समाज! अकलूजमध्ये भव्य महिला आरोग्य शिबिराला महिलांची मोठा प्रतिसाद !

“मी प्रथम निरोगी!” – डॉ. मीनाक्षी जगदाळे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने महिलांमध्ये जागरूकता वाढली

अकलूज : प्रतिनिधी

विवा हॉस्पिटल, अकलूज आणि जिजाऊ ब्रिगेड (पुणे विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त भव्य महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी हिमोग्लोबिन, थायरॉइड, ब्लड शुगर अशा महत्त्वपूर्ण तपासण्यांचे मोफत आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या प्रतिसादाने शिबिर परिसर दिवसभर गर्दीने फुलून गेला.

शिबिरात विवा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती गांधी यांनी महिलांना येणारे दैनंदिन आरोग्य प्रश्न, गर्भाशयाचे विकार, मासिक पाळीतील समस्या, तसेच प्रसूतीपूर्व–प्रसूतीनंतरची काळजी याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. “नियमित आरोग्य तपासणी ही प्रत्येक महिलेसाठी अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी सांगून महिलांना आरोग्य जागरूकतेचे महत्त्व पटवून दिले.

यानंतर डॉ. जयदीप काळे यांनी आयव्हीएफ (IVF), वंध्यत्व उपचार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हजारो जोडप्यांच्या आयुष्यात घडलेल्या परिवर्तनाची सविस्तर माहिती दिली. महिलांनी वंध्यत्व, हार्मोनल समस्या व प्रजनन आरोग्याविषयी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत मार्गदर्शन घेतले.

शिबिराचे विशेष आकर्षण ठरलेले मार्गदर्शन सत्र डॉ. मीनाक्षी जगदाळे यांनी घेतले. “स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असून तिचे आरोग्य सक्षम असेल तर संपूर्ण समाज निरोगी राहतो. ‘मी प्रथम निरोगी’ हा विचार प्रत्येक महिलेनं स्वीकारायलाच हवा,” असे प्रभावी शब्दात त्यांनी सांगितले. स्त्री–कुटुंब–समाज या त्रिसूत्रीचे महत्त्व त्यांनी मार्मिक उदाहरणांसह स्पष्ट केले. उपस्थित महिलांसाठी हे सत्र प्रेरणादायी ठरले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका थोरात यांनी केले. बालदिनानिमित्त लहान मुलांकडून केक कापून बालदिनाचा उत्साहात आनंद लुटण्यात आला.शिबिर यशस्वी करण्यासाठी विवा हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा सौ. सुषमा पाटील, सौ. सुवर्णा शेंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. असंख्य महिलांनी सहभाग नोंदवलेल्या या शिबिरामुळे महिलांमध्ये आरोग्यजागरूकता वाढीस लागल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे