Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

नगरपालिकेच्या कारभाराला नवी दिशा; विनोद उर्फे पिटू गंगणे सोमवारी पदभार स्वीकारणार !

नगरपालिकेच्या कारभाराला नवी दिशा; विनोद उर्फे पिटू गंगणे सोमवारी पदभार स्वीकारणार !

0 7 6 4 9 7

नगरपालिकेच्या कारभाराला नवी दिशा; विनोद उर्फे पिटू गंगणे सोमवारी पदभार स्वीकारणार !

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर नगरपालिकेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होत असून, नुतन नगराध्यक्ष विनोद ऊर्फ पिंटू गंगणे हे सोमवारी नगरपालिकेत अधिकृतरित्या दाखल होणार आहेत. नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच औपचारिक प्रवेश असल्याने शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.निवडणूक प्रक्रियेत जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलानंतर विनोद गंगणे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. शांत, संयमी पण ठाम नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या गंगणे यांच्याकडून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.नगरपालिकेत होणाऱ्या या प्रवेशावेळी सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, १८ नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. यावेळी नगराध्यक्ष गंगणे शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडणार असल्याची चर्चा आहे.


शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी समस्या यांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी याआधीच व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर नगरपालिकेच्या कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेवर आलेले नेतृत्व आणि त्यांचा नगरपालिकेत होणारा हा प्रवेश तुळजापूरच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे