Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

निर्दोष मुक्तता! गांजा तस्करी प्रकरणात पी.एस.आय गणेश झिंजुर्डे व कॉन्स्टेबल रवींद्र राऊत निर्दोष

ॲड. विशाल साखरे यांच्या युक्तिवादाची दखल घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी पी.एस.आय गणेश झिंजुर्डे व कॉन्स्टेबल रवींद्र राऊत यांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले.

0 7 6 4 9 9

निर्दोष मुक्तता! गांजा तस्करी प्रकरणात पी.एस.आय गणेश झिंजुर्डे व कॉन्स्टेबल रवींद्र राऊत निर्दोष

धाराशिव : नळदुर्ग ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल ९७.९६ किलो गांजा जप्ती प्रकरणात पी.एस.आय गणेश झिंजुर्डे आणि कॉन्स्टेबल रवींद्र राऊत यांना धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. तर या प्रकरणातील इतर तिन्ही आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख ५० हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.

▪️गुन्ह्याची पार्श्वभूमी

ही कारवाई १७ व १८ जून २०२० रोजी करण्यात आली होती. नळदुर्ग ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर गावाजवळ इनोव्हा कार (एम.एच. २५ / ए.एल. ९१९९) मधून गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे महसूल विभागाचे अधिकारी व पंचांसमक्ष पोलिसांनी सापळा रचून सदर कार पकडली. वाहनाच्या झडतीमध्ये ५ प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये एकूण ९७.९६० किलोग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे १९ लाख ५९ हजार २०० रुपये होती.यासोबतच इनोव्हा गाडी व मोबाईलसह एकूण ३४ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

▪️तपासातील खुलासे व अटक

या प्रकरणात सुरुवातीला गाडीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. पुढील तपासादरम्यान मोबाईलचे सीडीआर (CDR) आणि टॉवर लोकेशनच्या आधारे या गुन्ह्यात एका महिला आरोपीचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार ही महिला आरोपीच्या नावावर असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिलाही अटक करून तिच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

▪️पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोप कसे झाले ?

प्रकरणाची जवळपास दोन वर्षे सुनावणी झाल्यानंतर, महिला आरोपीस पळवून लावले आणि गाडीत असलेल्या आरोपींना मदत केली असा आरोप ठेवून पी.एस.आय गणेश झिंजुर्डे व कॉन्स्टेबल रवींद्र राऊत यांना आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले.त्या वेळी ॲड. विशाल साखरे यांनी दोघांसाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने तो मंजूर केला.

▪️न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे

सुनावणीदरम्यान ॲड. विशाल साखरे यांनी तपासातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले.

▪️वास्तविक गांजा वाहतूक करणाऱ्या गाडीवर रेड ही पीएसआय गणेश झिंजुर्डे व रवींद्र राऊत यांनीच केली होती, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेडचे क्रेडिट घेण्यासाठी चौकशीत ते उपस्थित नसल्याचे दाखवले.

▪️एफआयआर व रेडची वेळ बदलण्यात आली होती.
दोघांना खोट्या डिपार्टमेंटल चौकशीत गुंतवून प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे ॲड.विशाल साखरे यांनी न्यायालयात अर्ज करून मागवले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी चार अतिरिक्त दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सुनावणीदरम्यान ॲड. साखरे यांनी पोलिस अधिकारी व साक्षीदारांचा कसून उलटतपास घेतला. तसेच डिपार्टमेंटल चौकशीचा अहवाल आणि साक्षीपुरावे न्यायालयासमोर सादर करत, रेड ही प्रत्यक्षात झिंजुर्डे व राऊत यांनीच करून गांजा वाहतूक करणारी गाडी पकडली असल्याचा युक्तिवाद केला.या सोबतच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर करत दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निर्दोष मुक्त करण्याची मागणी करण्यात आली.

▪️न्यायालयाचा निर्णय

हे प्रकरण जिल्ह्यात बहुचर्चित ठरले होते. ॲड. विशाल साखरे यांच्या युक्तिवादाची दखल घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी पी.एस.आय गणेश झिंजुर्डे व कॉन्स्टेबल रवींद्र राऊत यांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे ,ॲड.अमित गोळे, ॲड,पृथ्वीराज खोचरे आणि महेश पवार यांनी सहकार्य केले.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे