Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजाभवानी मंदिर संवर्धन कामाचा आढावा; १४ नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक

0 7 6 5 0 5

तुळजाभवानी मंदिर संवर्धन कामाचा आढावा; १४ नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक

मुंबई : प्रतिनिधी
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व संवर्धन कामाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता फोर्ट जॉर्ज, मुंबई येथील पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयात होणार आहे.
मा.सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी नुकतीच तुळजाभवानी मंदिराची पाहणी केली होती. त्या पाहणीनंतर मंदिरातील सुरू असलेल्या जतन–संवर्धन कामांचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ही आढावा बैठक आयोजित केली असून संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे.
बैठकीस मंदिराशी निगडित प्रमुख मंडळांचे पदाधिकारी, मंदिर संस्थान प्रशासन तसेच संवर्धन कामे करणाऱ्या संस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीतील प्रमुख निमंत्रित
• उपाध्ये पुजारी मंडळ,अध्यक्ष
अनंत कोंडो.
• पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे.
• भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम.
• तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान
• तेजस्विनी आफळे असोसिएटस्, औरंगाबाद
• सहाय्यक संचालक, पुरातत्व (छत्रपती संभाजीनगर विभाग)
• मे.साईप्रेम कन्स्ट्रक्शन
• Savani Heritage, मुंबई
या बैठकीत मंदिरातील चालू जतन कामांची सद्यस्थिती, होणारा खर्च, आवश्यक सुधारणांची यादी आणि पुढील टप्प्यांचा रोडमॅप यावर सविस्तर चर्चा होणार आहे. राज्यातील सर्वात महत्वाच्या देवस्थानांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाबाबत शासन गंभीर असून पुढील काही महिन्यांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे