विद्यार्थ्यांनी बनवले दिवाळी उजळवणारे आकाशकंदिल
विद्यार्थ्यांनी बनवले दिवाळी उजळवणारे आकाशकंदिल
विद्यार्थ्यांनी बनवले दिवाळी उजळवणारे आकाशकंदिल
कळंब (ता. १६) : प्रतिनिधी
दिवाळीचा उत्साह शाळांपर्यंत पोहोचवताना कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव तासिकेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दिवाळीची शोभा वाढवली.

शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या रंगसंगतीचे आणि आकाराचे आकर्षक आकाशकंदिल तयार केले. या उपक्रमाला सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुख्याध्यापक श्री. संतोष भोजने यांनी सांगितले की, उद्या शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर हा या सत्रातील शेवटचा कार्यदिन असून, या दिवशी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत गुलाबजामूनच्या भोजनासह सत्र निकालाचे वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमात सहशिक्षिका श्रीमती आशा पवार, श्रीमती रसिका आगरकर, युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती सुजाता कदम तसेच सहशिक्षक श्री. संतोष मोहिते व श्री. सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



