Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

रविवार सुट्टीत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; पहाटे एक वाजताच मंदिर खुले

रविवार सुट्टीत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; पहाटे एक वाजताच मंदिर खुले

0 7 6 5 0 5

रविवार सुट्टीत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; पहाटे एक वाजताच मंदिर खुले

तुळजापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी रविवार व सोमवार सुट्टीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळणार. रविवार दिनांक २५ रोजी पहाटेपासूनच मंदिर परिसर, दर्शन रांगा, बिडकर पायऱ्या व मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. राज्यासह परराज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष नियोजन राबविले आहे. पहाटे एक वाजताच चरणतीर्थानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सोमवारीही दर्शन घेण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसरणारा नाही.आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी दर्शन रांगा बिडकर पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येत होत्या. गर्दी नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी, स्वयंसेवक व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. शिस्तबद्ध रांगा, शांत वातावरण आणि प्रशासनाचे योग्य नियोजन यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने पेड पास सेवा काही वेळ तात्पुरती बंद ठेवली होती. सर्वसामान्य भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. मंदिर परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय पथक, तसेच आपत्कालीन सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी विशेष मदत केंद्र कार्यरत ठेवण्यात आले आहे. आगामी दोन दिवसांत भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन अधिक दक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले.

या दोन दिवसांच्या सुट्टीमुळे तुळजापूर नगरी पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि शिस्त यांचे सुंदर दर्शन घडवणारी ठरली असून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे