Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरातील नागरी समस्या टोकाला; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, आंदोलनाचा इशारा

तुळजापूरातील नागरी समस्या टोकाला; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, आंदोलनाचा इशारा

0 7 6 4 9 6

तुळजापूरातील नागरी समस्या टोकाला; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, आंदोलनाचा इशारा

तुळजापूर : शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नगर परिषद तुळजापूर येथील मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांना मा. तहसीलदार, तुळजापूर यांच्या मार्फत राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष किरण यादव यांनी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. काही वस्त्यांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.तसेच शहरातील पाणीपुरवठा दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून इतर मूलभूत सुविधांबाबतही प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.या निवेदनावर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष किरण यादव यांची स्वाक्षरी आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे