ब्रेकिंगमहाराष्ट्र
कळंबमध्ये गावठी दारू प्रकरण उघड;पोलिसांची कारवाई,एक जण ताब्यात!
कळंब प्रतिनिधी भिकाजी जाधव
0
7
6
4
9
7
कळंबमध्ये गावठी दारू प्रकरण उघड;पोलिसांची कारवाई,एक जण ताब्यात!
कळंब : प्रतिनिधी
कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत पोलिसांनी गावठी दारू निर्मितीचे साहित्य जप्त केले आहे. सुरज तानाजी पवार (वय ३४, रा.मार्केट यार्ड,कळंब) याच्याविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता पोलिसांनी छापा टाकला असता, पवार याच्या घराजवळ १४,५०० रुपयांचे २०० लिटर गुळमिश्रीत रासायनिक द्रव व २५ लिटर तयार गावठी दारू अवैध विक्रीसाठी साठवलेली आढळली. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
अवैध मद्यविक्रीविरोधातील ही कारवाई कळंब पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम पथकाने केली असून, नागरिकांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
0
7
6
4
9
7



