ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांकडे अमोल जाधव यांची मागणी
0
8
5
6
2
6
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांकडे अमोल जाधव यांची मागणी
तुळजापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरमध्ये येत असतात. अशा परिस्थितीत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक प्रशासकीय पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.
जाधव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, उपजिल्हा रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक आणि कनिष्ठ लिपिक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयातील दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.

तुळजापूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने अपघातग्रस्त तसेच तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्था सक्षम करण्यासाठी ही पदे तात्काळ भरावीत व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी अमोल जाधव यांनी आरोग्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
0
8
5
6
2
6



