Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

उमरगा येथे ‘काव्यांगण दीपोत्सव’ कवी संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

0 7 6 4 9 7

उमरगा येथे ‘काव्यांगण दीपोत्सव’ कवी संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

उमरगा : प्रतिनिधी

काव्यांगण साहित्य मंच आयोजित ‘काव्यांगण दीपोत्सव तथा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा’ उत्साहात पार पडला. शनिवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी उमरगा येथील समाज विकास संस्था सभागृहात हा सोहळा थाटात संपन्न झाला. साहित्यिक, कवी, रसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीने परिसर साहित्यरसिकतेने उजळून निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रवीण स्वामी यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर काव्याच्या सोहळ्याला प्रारंभ झाला.

प्रास्ताविक करताना मंचाध्यक्ष विकास राठोड यांनी काव्यांगणच्या उपक्रमांची माहिती दिली. आमदार प्रवीण स्वामी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “काव्यांगण साहित्य मंचाने उमरगा शहरात साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन नवा पायंडा पाडला आहे. या मंचामुळे नवोदित कवींना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते,” असे ते म्हणाले.

यावेळी आमदार स्वामी यांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्यरत्न, आदर्श माता, काव्यरत्न, आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका, उत्कृष्ट काव्यसंग्रह, हिरकणी, उत्कृष्ट कादंबरी, आदर्श समाजसेवक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, मानवस्त्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच ५० निमंत्रित कवींनाही मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

दुपारच्या सत्रात रंगतदार काव्यसादरीकरण झाले. धुळे, जळगाव, लातूर, धाराशिव, नागपूर, अमरावती, अकोला आदी ठिकाणांहून आलेल्या दीडशेहून अधिक साहित्यिक आणि कवींनी आपली काव्यरचना सादर केली.

व्यासपीठावर आमदार प्रवीण स्वामी, संमेलनाध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, काव्यांगण साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड, डॉ. संजय राठोड, एड. शुभदा पोतदार, सुवर्णा पवार, डी. व्ही. खरात, डॉ. बबन महामुनी, सुभाष सोनवणे, प्रा. दिलीप पवार, अंकुश पडधान आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष विकास राठोड, उपाध्यक्ष प्रमोद उबाळे, सचिव वृंदा गंभीर, कार्याध्यक्ष ज्योती लाभसेटवर, तसेच किशोर पांचाळ, रवीराज राठोड, अशोक चव्हाण, सोपान पवार, के. पी. बिराजदार यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. महादेव गपाट यांनी सांभाळली.

समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. पुढील काळात काव्यांगणसाठी कायमस्वरूपी हॉल उपलब्ध करून देण्याची हमीही त्यांनी दिली.

या सोहळ्यामुळे उमरगा शहरात साहित्यप्रेमाचा माहोल निर्माण झाला असून परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे