Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर शहर आता ‘सीसीटीव्ही’च्या नजरेखाली! १४ ऑगस्टला भव्य उद्घाटन; शहर सुरक्षा व्यवस्थेला मिळणार तंत्रज्ञानाची कवचकुंडल

तुळजापूर शहर आता ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत

0 8 5 6 3 1

तुळजापूर शहर आता ‘सीसीटीव्ही’च्या नजरेखाली!

१४ ऑगस्टला भव्य उद्घाटन; शहर सुरक्षा व्यवस्थेला मिळणार तंत्रज्ञानाची कवचकुंडल

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराची वाढती लोकसंख्या, देशभरातून येणारे भाविक आणि शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत धाराशिव जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ (सर्वसाधारण) मधून साकारण्यात आलेल्या तुळजापूर शहर सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

 

या प्रकल्पामुळे शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख रस्ते आणि संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यास मदत होणार असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासह संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश उर्फ पवन राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण, विक्रम काळे, बसवराज पाटील, आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार प्रविण स्वामी तसेच तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे उपस्थित राहणार आहेत.

◾प्रशासन-पोलिस यंत्रणेची उपस्थिती

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील आणि तुळजापूरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

◾भाविकांच्या सुरक्षेलाही मोठा फायदा

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी वर्षभर मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल होतात. उत्सव, यात्रा व गर्दीच्या काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, चोरीसारख्या घटनांवर लक्ष ठेवणे आणि गुन्हे घडल्यानंतर तपासाला दिशा देण्यासाठी सीसीटीव्ही प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ देणाऱ्या या प्रकल्पाकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे