Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

हलगीचा कडकडाट अन् वाळलेल्या सोयाबीनची साक्ष! शेतकरी आसूड-रुमण मोर्चाने कळंब तहसील दणाणले

कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह हेक्टरी एक लाखांची मदत, चारा-पाणी छावण्या व कर्जमाफीची छावाची मागणी

0 8 5 6 2 9

हलगीचा कडकडाट अन् वाळलेल्या सोयाबीनची साक्ष! शेतकरी आसूड-रुमण मोर्चाने कळंब तहसील दणाणले

कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह हेक्टरी एक लाखांची मदत, चारा-पाणी छावण्या व कर्जमाफीची छावाची मागणी

कळंब | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना, कळंब यांच्या वतीने गुरुवारी दि. १७ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या शेतकरी आसूड व रुमण मोर्चाने कळंब तहसील कार्यालयावर धडक दिली. हलगीचा कडकडाट, हातात वाळलेली सोयाबीनची पिके आणि सरकारचे लक्ष वेधणाऱ्या घोषणांनी कळंब शहर दुमदुमून गेले.

दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. हलगी वाजवत आणि हातात वाळलेली सोयाबीनची पिके घेऊन शेतकरी व छावा कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अहिल्याबाई होळकर चौक या मार्गावरील प्रत्येक चौकात महापुरुषांना अभिवादन करून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.

छावा संघटना प्रमुख नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने प्रदेश कार्याध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

◾छावाच्या सहा प्रमुख मागण्या

मोर्चाच्या माध्यमातून कोरडा दुष्काळ तातडीने जाहीर करावा, सरसकट शेतकऱ्यांना कोणताही पंचनामा न करता हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, जनावरांसाठी पाणी व चारा छावण्या तातडीने मंजूर कराव्यात, अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठवाड्यासाठी स्वतंत्र स्थापन करून निधी मंजूर करावा, मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकरी कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

मोर्चाला मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब भोसले, धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, मराठवाडा कार्याध्यक्ष अमर भाई शेख, शेतकरी आघाडी अध्यक्ष भागवतराव खांडपुरे, शेतकरी नेते हरिभाऊ काळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कळंब तालुकाध्यक्ष अमर गायकवाड, युवा अध्यक्ष सचिन पठाडे, परंडा अध्यक्ष आकाश जेधे, संघटक मंगेश सुकाळे, अमोल गोरे, ज्योतीराम काळे, शिवहरी भोसले, लहू शिंदे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, शेतकरी, छावा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.मोर्चाचे सूत्रसंचालन व आभार धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी मानले.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे