Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरात स्वच्छतेचा संकल्प;घाटशीळ परिसरात मंदिर संस्थान तर्फे भव्य स्वच्छता मोहीम !

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरात स्वच्छतेचा संकल्प;घाटशीळ परिसरात मंदिर संस्थान तर्फे भव्य स्वच्छता मोहीम !

0 7 6 4 9 7

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या स्वच्छता विभागा मार्फत घाटशीळ मार्गासह मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

भाविकांना स्वच्छ, स्वच्छंद आणि आकर्षक वातावरण लाभावे, यासाठी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, झाडांची पाने, प्लास्टिक व अन्य घाण कचरा दूर करून घाटशीळ परिसराचे सुशोभीकरण केले.

या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक, सहायक स्वच्छता निरीक्षक, सुपरवायझर तसेच स्वच्छता कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. भाविकांच्या सोयीसाठी संपूर्ण परिसर झळाळून निघाला.

मंदिर संस्थानामार्फत स्वच्छतेबाबत सातत्याने उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून, “स्वच्छता हीच सेवा!” हा संदेश या मोहिमेतून प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरासह तुळजापूर पुण्य पावननगरी स्वच्छतेच्या तेजाने उजळली!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे