Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरात कोजागिरी पौर्णिमेसाठी वाहतूक बदल; ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान काही मार्गांवर वाहनांना मनाई

तुळजापूरात कोजागिरी पौर्णिमेसाठी वाहतूक बदल; ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान काही मार्गांवर वाहनांना मनाई

0 7 6 4 9 6

तुळजापूरात कोजागिरी पौर्णिमेसाठी वाहतूक बदल; ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान काही मार्गांवर वाहनांना मनाई

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरात लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीतील कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक रितु खोकर (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ब) अन्वये तुळजापूर व परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२.०१ पासून ते ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत काही मार्गांवर सर्व प्रकारच्या हलक्या व जड वाहनांना (Light & Heavy Vehicles) प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

◾ज्या मार्गांवर वाहनांना मनाई असेल:

1️⃣ छत्रपती संभाजीनगर → धाराशिव → तुळजापूर → नळदुर्ग → हैद्राबाद
2️⃣ हैद्राबाद → नळदुर्ग → तुळजापूर → धाराशिव → छत्रपती संभाजीनगर
3️⃣ लातूर → औसा → तुळजापूर → तामलवाडी → सोलापूर
4️⃣ सोलापूर → तामलवाडी → तुळजापूर → औसा → लातूर
5️⃣ छत्रपती संभाजीनगर → येरमाळा → धाराशिव → तुळजापूर → सोलापूर
6️⃣ सोलापूर → तामलवाडी → तुळजापूर → धाराशिव → येरमाळा
7️⃣ तुळजापूर → ढेकरी → गौडगाव → बार्शी
8️⃣ बार्शी → गौडगाव → ढेकरी → तुळजापूर

◾पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे निश्चित:

▪️छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबाद: बीड – अंबाजोगाई – लातूर – औसा – उमरगा

▪️हैद्राबाद ते छत्रपती संभाजीनगर: उमरगा – लातूर – अंबाजोगाई – बीड

▪️धाराशिव ते सोलापूर आणि उलट: वैराग मार्गे

▪️लातूर ते सोलापूर: मुरुड – ढोकी – येडशी – बार्शी

▪️सोलापूर ते लातूर: बार्शी – येडशी – ढोकी – मुरुड

▪️तुळजापूर ते सोलापूर: मंगरुळ पाटी – इटकळ – बोरामणी

▪️सोलापूर ते तुळजापूर: बोरामणी – इटकळ – मंगरुळ पाटी

▪️बार्शी ते तुळजापूर: बार्शी – वैराग – धाराशिव

▪️तुळजापूर ते बार्शी: तुळजापूर – धाराशिव – बार्शी

प्रशासनाच्या आदेशानुसार ही वाहतूक मर्यादा पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवा व एस.टी. बसेस यांना लागू राहणार नाही.

उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांनी दिलेल्या अहवालानुसार, कोजागिरी पौर्णिमा (दि. ६ ऑक्टो.) व मंदिर पौर्णिमा (दि. ७ ऑक्टो.) या दोन दिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून लाखो भाविक पायी तुळजापूरकडे येतात. त्यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा वाहतूक बदल करण्यात आला आहे.भाविकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केले आहे.

4.7/5 - (3 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे