Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिवात ३५ हजारांचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

धाराशिवात ३५ हजारांचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

0 7 6 5 0 5

धाराशिवात ३५ हजारांचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

धाराशिव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब गोपीनाथ जाधव (वय ४२, रा. घाटंग्री, ता. जि. धाराशिव) हा दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील सांजा वेस गल्ली परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून तपासणी केली असता आरोपीच्या ताब्यातील टीव्हीएस मोटारसायकल (क्र. एमएच २५ एए ५४६३) वर गुटखा, पान मसाला, सुपारी, आर-१००० गुटखा पान मसाला तसेच गोवा १००० अशा विविध प्रकारचा एकूण ३५ हजार ५६० रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला.यावेळी पोलिसांनी संबंधित गुटखा साहित्य जप्त करून आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे