ब्रेकिंगमहाराष्ट्र
तामलवाडीत पोलिसांची धडक कारवाई; ४६ ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोघे जेरबंद
पुणे–सोलापूर लिंकवर नाकेबंदी; शेतात लपूनही आरोपींचा पाठलाग करून पकड

0
7
6
5
0
5
तामलवाडीत पोलिसांची धडक कारवाई; ४६ ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोघे जेरबंद

पुणे–सोलापूर लिंकवर नाकेबंदी; शेतात लपूनही आरोपींचा पाठलाग करून पकड
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत ४६ ग्रॅम एमडी (ड्रग्ज) जप्त करून दोन आरोपींना अटक केली असून. पुण्यातून ड्रग्जची तस्करी होत असल्याची माहिती सोलापूर पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ तामलवाडी पोलिसांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या नाकेबंदीत ही कारवाई यशस्वी ठरली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कार अडवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी यू-टर्न घेत तामलवाडी गावाच्या दिशेने पळ काढला. यावेळी मुख्य आरोपी तौसिफ फरीद सय्यद (रा.कसबा पेठ, पुणे) हा राजमुद्रा हॉटेल परिसरात कारमधून उतरून ज्वारीच्या शेतात पळून गेला. तर दुसरा आरोपी सुफयान शब्बीर फुलारी (रा. पुणे) याने कार पिंपळा गावाच्या दिशेने वळवली; मात्र रस्त्यात कार बंद पडल्याने तो शेतात लपून बसला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या पथकाने उमेश माने, गोपाळ सलगर यांच्या मदतीने दोन्ही आरोपींचा पाठलाग करत त्यांना अटक केली. तौसिफ सय्यद हा पळून जात असताना तहान लागल्याने गावातील पाणपोईवर पाणी पिताना दिसून आला. नागरिकांनी त्याची ओळख पटवून पोलिसांना माहिती दिल्यानंतर सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडण्यात आले.दरम्यान, सुफयान फुलारी हा शेतातील विहिरीत उतरून कपारीत लपून बसल्याचे आढळून आले.

शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.आरोपींकडून ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, पुढील तपासासाठी दोघांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वीही तामलवाडी परिसरात ड्रग्ज कारवाईनंतर तुळजापूरमधील मोठे रॅकेट उघडकीस आले होते.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्यामार्गदर्शनाखाली पार पडली असून, तामलवाडी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
7
6
5
0
5



