ब्रेकिंगमहाराष्ट्र
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी आदित्य ठाकरे मराठवाड्यात! धाराशिव-लातूरमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; २६ सप्टेंबरला तुळजापूरच्या खानापूरपासून दौऱ्याला सुरुवात
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी आदित्य ठाकरे मराठवाड्यात! धाराशिव-लातूरमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; २६ सप्टेंबरला तुळजापूरच्या खानापूरपासून दौऱ्याला सुरुवात

0
8
5
6
3
1
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी आदित्य ठाकरे मराठवाड्यात!
धाराशिव-लातूरमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; २६ सप्टेंबरला तुळजापूरच्या खानापूरपासून दौऱ्याला सुरुवात
धाराशिव, : तुळजापूरनामा
मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाकडून या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथून होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता लोहारा तालुक्यातील आष्टा मोड येथे पाहणी करण्यात येणार आहे. पुढे दुपारी १२.४५ वाजता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तावशी ताड येथे आदित्य ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान शेतकरी, स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांशी संवाद साधून दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेण्याचा कार्यक्रम असल्याचे जाहीर वेळापत्रकातून स्पष्ट झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील खानापूर आणि आष्टा मोड या भागांतील पाहणीकडे स्थानिक शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिकांची स्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत दौऱ्यात काय भूमिका मांडली जाते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
◾दौऱ्याचे ठिकाण व वेळ :
सकाळी १० वा. — खानापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
सकाळी ११ वा. — आष्टा मोड, ता. लोहारा, जि. धाराशिव
दुपारी १२.४५ वा. — तावशी ताड, ता. औसा, जि. लातूर
0
8
5
6
3
1



