Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची गैरसोय; मूलभूत सुविधांचा अभाव

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, एअर मशीनसह आवश्यक सोयी नसल्याची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

0 7 6 4 9 7

तुळजापूर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची गैरसोय; मूलभूत सुविधांचा अभाव

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, एअर मशीनसह आवश्यक सोयी नसल्याची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. या संदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर करून संबंधित पेट्रोल पंपांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.तुळजापूर तालुक्यात राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत विविध कंपन्यांचे अनेक पेट्रोल पंप कार्यरत आहेत. या पेट्रोल पंपांवर ग्राहकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, वाहनांसाठी एअर मशीन, तसेच प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात या सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.लांब पल्ल्याचा प्रवास करणारे वाहनचालक, महिला प्रवासी तसेच ज्येष्ठ नागरिकांना या सुविधांचा अभाव जाणवत असल्याने मोठी अडचण निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पेट्रोल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही काही पेट्रोल पंप चालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.यामुळे संबंधित विभागाने तुळजापूर तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांची पाहणी करून ज्या ठिकाणी ग्राहकांना आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत, त्या पेट्रोल पंपांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात येथील पत्रकार संजय खुरुद, शुभम कदम, स्थानिक नागरिक अमर प्रकाश गिरी, गणेश वसंत कावरे, विजय शिवाजी पवार, राजू धनसिंग चव्हाण आणि बालाजी भैरवनाथ पाटील यांच्या स्वाक्षरीने पुरवठा विभागामा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे. हा अर्ज तुळजापूर तहसीलदार यांच्यामार्फत शुक्रवार (दि.१३) रोजी सादर करण्यात आला असून प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे