Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिव बसस्थानकात तोडफोड करणारे आरोपी २४ तासांत गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; ७.५० लाखांची कार जप्त

0 7 6 5 0 5

धाराशिव बसस्थानकात तोडफोड करणारे आरोपी २४ तासांत गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; ७.५० लाखांची कार जप्त

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव बसस्थानक परिसरात रात्री उभ्या असलेल्या बसवर दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक करून गजाआड केले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ अन्वये कलम ३२४(५), ३(५) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलीस अधीक्षिका श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षिका श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २२ जानेवारी २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बस फोडणारे आरोपी कळंब परिसरात आहेत. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करून कळंब येथून तिघांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – साईनाथ गणेशराव सावंत (२५), रा. गोर्था उमरी, नांदेड.,श्रावण उर्फ पंपु राजेंद्र शिंदे (२५), रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड.,अमोल भिमराव भोंग (२४), रा. राहेगाव, जि. नांदेड.,चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष तांदुळवाडी (ता. कळंब) येथे आमरण उपोषणाला बसले असून शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने निषेध म्हणून धाराशिव बसस्थानक येथे बसवर कागद चिकटवून नंतर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली.या गुन्ह्यात वापरण्यात आलेली ओंरा होंडा कार (MH 25 AS 5142), अंदाजे किंमत ७ लाख ५० हजार रुपये, जप्त करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना आनंदनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार अमोल निंबाळकर, अमोल चव्हाण, बळी शिंदे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा बांगर व चालक पोलीस अंमलदार दहीहंडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे