Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरसेवक पंडितराव जगदाळेंचे शाळेसाठी अनुकरणीय योगदान सर्व मीटिंग भत्ते नगरपरिषद शाळेस देण्याचा निर्णय

0 7 6 4 9 9

नगरसेवक पंडितराव जगदाळेंचे शाळेसाठी अनुकरणीय योगदान सर्व मीटिंग भत्ते नगरपरिषद शाळेस देण्याचा निर्णय

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. ३, तुळजापूर (खुर्द) या शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी नगरसेवक पंडितराव देविचंद जगदाळे यांनी आपले नगरसेवक पदाचे सर्व मीटिंग भत्ते (मानधन) सदर शाळेस देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे.
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. ३ ही शाळा शैक्षणिक गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाते. सन २००८-०९२००९-१० या शैक्षणिक वर्षात लातूर विभागात सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावलेल्या या शाळेने सन २०१७ मध्ये मराठवाड्यातील पहिली ISO मानांकनप्राप्त नगरपालिकेची शाळा होण्याचा मान मिळवला आहे. तसेच सौरऊर्जेवर चालणारी ही महाराष्ट्रातील पहिली शाळा असल्याचे विशेषत्वाने उल्लेखनीय आहे.सध्या या शाळेत ४४७ विद्यार्थी शिक्षण घेत असून १४ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान देणारे नगरसेवक पंडितराव जगदाळे यांनी यापूर्वीही सन २००१ पासून नगरसेवक पदाचे तसेच सन २०१७ मधील प्रभारी नगराध्यक्ष पदाचे मानधन शाळेस दिले आहे.
सन २०२५ च्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत सलग पाचव्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर, आपण नगरसेवकपदावर असेपर्यंत मिळणारे सर्व मीटिंग भत्ते मुख्याध्यापक, नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. ३, तुळजापूर (खुर्द) यांना देण्यात यावेत, नगरसेवक जगदाळेंच्या या निर्णयाचे शहरातील नागरिक, पालकवर्ग व शिक्षणप्रेमींमधून कौतुक होत असून लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे